Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

भारतीय दंड संहिता

September 21, 2012

भारतीय दंड संहिता, अर्थात इंडियन पीनल कोड म्हणून आज आपण ज्या कायदे-नियमांचे पालन करतो, तो कायदाकेव्हा बनवला गेला, याबाबत फार कमी जणांना माहिती असेल. इंग्रजांच्या राजवटीत 1860 साली यात गुन्हेगारी संदर्भातील सर्व कलमांचा समावेश करण्यात आला. 1862 साली त्याचा प्रत्यक्ष वापर ब्रिटिशांनी हिंदुस्थानात सुरू केला. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर त्यात गरज भासेल, तसे काही बदल केले गेले. मात्र, मूळ मसुद्यात काहीही बदल करण्यात आलेला नाही. ब्रिटिशांनी तो जसा लिहिला, तसाच तो आपण अंमलात आणला. गंमत म्हणजे हाच कायदा हिंदुस्थानचे लचके तोडून निर्माण करण्यात आलेल्या पाकिस्तानात पाकिस्तान पिनल कोड म्हणून तेथील राज्यकर्त्यांनी वापरात ठेवला आहे.

ब्रिटिशांनी ज्या-ज्या देशांवर राज्य केले, त्या-त्या देशांमध्ये तो आजही वापरात आहे, हे विशेष.

भारतीय दंड संहिता लागू करण्यापूर्वी 1860 पर्यंत देशात इंग्लिश क्रिमिनल लॉचा वापर केला जात होता. तत्कालिन बॉम्बे, कलकत्ता, मद्रास या ब्रिटिशांच्या मुख्यालयातून त्याबाबतची अंमलबजावणी होत असे.

याच्या केवळ नावातच ‘इंडियन’ हा शब्द इथला आहे, बाकीचे जे काही आहे, ते सर्व ब्रिटिशांचे आहे. यातील सारी कलमे इंग्रजांनी लिहिलेली आहेत. थॉमस मॅकले याच्या अध्यक्षतेखालील समितीने याचा मसुदा तयार केला. नेपोलेनिक कोड, तसेच एडवर्ड लिव्हिंग्स्टन लुझियाना सिव्हिल कोड (1825) मधल्या कलमांचा यात आहे तसा समावेश केला गेला. 1837 साली भा.दं.संहिता लिहायला घेतली गेली. 1850 साली तो निश्चित करण्यात आला. मात्र, 1857 साली हिंदुस्थानात झालेल्या सशस्त्र स्वातंत्र्यलढ्यामुळे तो अंमलात येऊ शकला नाही. 1 जानेवारी 1862 पासून पारतंत्र्यातील हिंदुस्थानात ब्रिटिशांनी भारतीय दंड संहिता, अर्थात इंडियन पिनल कोडखाली गुन्हेगारांवर कलमे लावण्यास सुरुवात केली.

याची ढोबळमानाने तीन भागात विभागणी करण्यात आली असून 511 कलमे आणि त्याअंतर्गत उपकलमे लावण्यात येतात. याच्या अखत्यारित बहुतांश गुन्हे येतात. त्याकाळात संगणकाचा शोध लागलेला नसल्याने, त्यासाठीचा ‘सायबर क्राईम’ हा साऱ्यांनीच नंतर समाविष्य करून घेतला. अमेरिकेत तर एफबीआयने सायबर क्राईमला रोखण्यासाठी इंटरनेट क्राईम कंम्प्लेंट सेंटरची (आयसी3) स्वतंत्र निर्मिती केली, हा भाग निराळा. असो.

आम्हाला ब्रिटिशांनी हिंदुस्थानासाठी इंडियन पिनल कोड कसा निर्माण केला, त्याबद्दल त्यांचे गोडवे गायचे नाहिय्येत. ब्रिटिशांनी हा कायदा केला, तो हिंदुस्थानात जो स्वातंत्र्यलढा सुरू झाला होता, त्याला अटकाव करण्यासाठी तो येथे लागू केला. त्यासाठी ब्रिटिशांनी लिहिलेली कायदे, कलमे इंडियनच्या नावाखाली इथे लागू केली.

लाला लाजपत राय ब्रिटिशांविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना, पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीमार केला, हे आपण सर्वांनिच इतिहासात वाचले असेल. या लाठीमारातच ते शहिद झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 4 जून रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात राजबाला याही शहिद झाल्या. ब्रिटिश पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानूषपणे लाठीमार केला, तसाच आजही होतो आहे. त्यावेळी त्याचे नेतृत्व गोऱ्यांकडे होते, आज काळ्यांकडे आहे. फक्त त्यांचा बोलवता धनी गोराच, तसेच विदेशी आहे. मग आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, असे म्हणावयास जीव धजावत नाही.

इंग्रजांनी भारतीय दंड संहिता लागू केली, त्यामागचे खरे कारण कमी जणांना माहिती असेल.

10 मे 1857 रोजी देशात स्वातंत्र्यप्राप्तीची ठिणगी पडली. मंगल पांडे यांनी केलेल्या सशस्त्र उठावाला देशभरातून व्यापक प्रतिसाद मिळाला. मंगल पांडे, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांनी केलेल्या लढ्यात जवळपास तीन लाख इंग्रज मारले गेले. मात्र, काही गद्दारांनी आपापले वतन सांभाळण्यासाठी ब्रिटिशांना साथ दिली. त्यामुळेच ते पुन्हा आपल्यावर 1947 पर्यंत राज्य करते झाले. याचा परिणाम म्हणून शहिद भगतसिंग, उधमसिंग, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिसमिल आणि कित्येक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी देशासाठी हसत-हसत हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्यलढ्याच्या यज्ञकुंडात 7 लाख 32 क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाच्या समिधा अर्पण केल्या, हे इतिहासाची पाने चाळली तर आपल्या लक्षात येईल.

ब्रिटिशांनी या लढ्याची धास्ती घेतल्यानेच आता सहजासहजी मरायचे या उद्देशानेच हिंदुस्थानात त्यांचा कायदा भारतीय दंड संहितेच्या नावाखाली आणला. या कायद्यामुळे 1857 सारखा सशस्त्र लढा पुन्हा उभारू द्यायचा नाही, असा त्यांचा हेतू होता. त्यामुळेच त्यांनी हिंदुस्थानी पोलिस निर्माण करून त्यांनाच हिंदुस्थानी जनतेच्या विरोधात उभे केले.

यात एक कलम आहे, आत्मसंरक्षणार्थ प्रतिकाराचा हक्क. या कलमाचा वापर करून आजही पोलिस एन्काऊंटर करताना दिसतात. तो वेगळाच विषय आहे.

या कलमाने पोलिसांच्या लाठ्यांना बळ दिले. पोलिसांनी हवा तितका लाठीमार केला, तरी ज्याच्यावर तो होत आहे, त्याने प्रतिकाराच प्रयत्न केला, अथवा लाठी हातात पकडली, तर कायदा-सुव्यवस्थेत अडथळा आणला म्हणून त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्याची पोलिसांना मुभा मिळाली. त्यामुळेच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने लाठीमार करणारे हिंदुस्थानी होते. मार खाणारेही हिंदुस्थानीच होते.

जमावबंदीसाठीचे 144 कलम आहे. त्यामुळे आंदोलकांना एकत्र येता येईना.

अशातच सायमन हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार होता. सायमनचा निषेध करण्यासाठी लाला लजपत राय यांनी शांततेच्या मार्गाने निषेध करण्याचे ठरवले होते. त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. सायमनला विरोध करण्यात आला. ते पाहून एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे डोके फिरले. त्याचे नाव सांड्रूस. त्याने लाठीमाराचा आदेश दिला. लाला लजपत राय यांच्या डोक्यात क्रूरपणे चौदा वेळा लाठीमार केला गेला. यात त्यांची प्राणज्योत मालवली. लाला लजपत राय यांच्यावर निर्दयपणे लाठीमार करण्याचे आदेश देणाऱ्या सांड्रूसच्या विरोधात भगतसिंग यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने झालेला लाठीमार हा कायद्याला धरून होता, असे सांगत सांड्रूसची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळेच सांड्रूसचा निकाल आता आपणच लावू, असा पण भगतसिंग यांनी केला. त्यानंतर काय झाले, हे आपण सर्वांनाच माहिती आहे. सांड्रूसची हत्या केल्याबद्दल भगतसिंग यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हसतहसत भगतसिंग फासावर चढले. स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात आणखी एक आहुती पडली.

त्यांच्या अखेरच्या काळात ते लाहोर येथील कारागृहात असताना काही पत्रकार त्यांना भेटायला गेले. देशवासियांसाठी, तसेच युवा पिढीसाठी काही संदेश द्यायचा आहे का, असा प्रश्न त्यांनी शहिद भगतसिंग यांना विचारला. ते इतकेच म्हणाले, ज्या इंडियन पिनल कोडने लाला लजपत राय यांचा बळी घेतला, ज्या भारतीय दंड संहितेमुळे मी फासावर चढवला जाणार आहे, त्या इंडियन पिनल कोडला देशाला जेव्हा केव्हा स्वातंत्र्य मिळेल, तेव्हा तरुणाईने त्याची होळी करावी. ही माझी मनापासूनची इच्छा आहे.

दुर्दैवाने देश स्वतंत्र होऊन 64 वर्षे उलटली, परंतु आजही शरमेची बाब म्हणजे हा कायदा हटवणे दूरच, त्याचीच प्रभावी अंमलबजावणी हिंदुस्थानी पोलिस आंदोलकांवरती करताना दिसत आहेत. ज्या लाठीमाराने लाला लजपत राय यांनी हौतात्म्य पत्करले, त्या आंदोलनकर्त्यांवर सर्वप्रथम केला जातो तो लाठीमारच. याच्या तडाख्यातून महिलाही सुटत नाहीत.

हिंदुस्थानात पोलिस आणले, म्हणून काही बुद्धिवादी ब्रिटिशांची भलावण करतात. मात्र, त्यांना एका गोष्टीचा विसर पडतो, कोणत्याही राजाने अथवा राणीने आपले सिंहासन सुरक्षित ठेवण्यासाठी सेना तैनात केल्या. पोलिस नाही. इंग्रजांनी स्वतःची कातडी बचावण्यासाठी, पोलिस दल उभे करून आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस दल उभारले, ज्यात पोलिस म्हणून हिंदुस्थानीच नेमले. अधिकारपदी मात्र इंग्रजच होते.

आता मला सांगा, आजही आपण ब्रिटिशांचे अंधानुकरणच करत नाही काय? 4 जूनला रामलीला मैदानावर विदेशातील काळे धन देशात आणण्यासाठी शांततेच्या मार्गाने जे आंदोलन सुरू होते, त्या आंदोलनकर्त्यांवर रात्री पोलिसांनी निद्रिस्त आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करून आंदोलन मोडून काढले. यात शेकडो जखमी झाले. राजबाला या मृत्यूमुखी पडल्या. काय फरक राहिला, इंग्रज आणि हिंदुस्थानी सरकार यांच्यात?

23 मार्च रोजी आद्य क्रांतीकारक भगतसिंग यांची पुण्यतिथी साजरी करतो. लाला लजपत राय यांचीही पुण्यतिथीही साजरी करतो. त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा आपल्याला नैतीक अधिकार आहे काय? ज्या कायद्यामुळे या दोघांचा बळी घेतला, तो कायदा आजही देशात अस्तित्वात आहे. अगदी ब्रिटिशांनी जे नाव ठेवले होते, त्याच नावाने तो आजही वापरला जात आहे. याच कायद्यातील कलमांचा वापर करून भगतसिंग यांना फासावर जावे लागले, याचा विसर आपल्याला पडला काय? आपण इतके कृतघ्न कसे काय आहोत? पोलिस आजही क्रूरतेने लाठीमार करत असतील, तर आपण स्वातंत्र्यात आहोत, असे मानायचे काय?

हिंदुस्थानी जनतेला गुलाम बनविण्यासाठी एकूण 34 हजार 700 कलमे इंग्रजांनी आपल्यावर लादली. दुर्दैवाने ती सारी कलमे आजही तशीच्यातशी वापरात आहेत. एकाही कलमाला रद्दबादल करण्यात आलेले नाही.

एक आणि एकच फरक आहे. त्यावेळी राज्यकर्ते ब्रिटिश होते. आज राज्यकर्ते हिंदुस्थानी आहेत, ब्रिटिशांच्या तैनाती असलेल्या हिंदुस्थानी पोलिसांसारखे. त्यांची सूत्रे मात्र, इटालियन माफिया सोनिया उर्फ अन्टोनिया माईनो हिच्या हाती आहेत. ब्रिटिशांनी जितकी लूट दिडशे वर्षांत केली, त्याच्या हजारपट लूट या माईनो फॅमिलीने गेल्या काही दशकांत केली आहे.

- संजीव ओक

Sanjeev Oak's Blog

Blog Stats
  • 18900 hits