Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

हल्लाबोल

September 02, 2012

इतक्या वेळेला आलो मी इथे या सभागृहामध्ये, लोकांना विचारत होतो, इथेहा एकच बल्ब मुतारीत लावतात, तसा का लावलाय कळत

नाहीय्ये.

चाचपडत चाचपडत जावंलागतं ना, वास आला इथे इथे छोटा बल्ब लावलेला असतो ना.

इतकं सगळं चांगलं एअरकंडिशन्डकरून ठेवलं आहे, मध्येच छोटा बल्ब लावून का असं केलंय मला कळत नाही. आवाज बसला असताना देखील...

त्यातील ऊर्जा मला महत्त्वाची वाटते. त्यांना माहिती असणार की माझाआवाज बसलाय, तरीही त्यांनी घोषणा दिली. मला वाटतं ही ऊर्जा महत्त्वाची आहे.

मी जे काही बोललो, ते अजून चालूच आहे. त्याच्यामुळे मी आज परतत्याच्यावरती काय बोलणार, याच्यासाठी आमचे सर्व पत्रकार बांधव कॅमेरे लावून उभेआहेत, बसलेले आहेत. पण जरा थोड्या वेळानी. बाळा नांदगावकरांनी मगाशी विषय काढला,पक्षाच्या स्थापनेला सात वर्षे झाली. या सात वर्षांत वेगवेगळे लोकं भेटली. वेगवेगळ्यालोकांचे वेगवेगळे अनुभव आले. अजूनही येताहेत, पुढेही येतील. परवा दिवशी मला असाचएक फोन आला. आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. बाळ नांदगावकर होते, आमचे नितीन सरदेसाईहोते, अजून कोण होते, मला आता... बरेच जण होते. काहीतरी दादरमध्ये कोणाचं तरी झालंतिकडे, कोणतरी आपले पक्षाचे नगरसेवक गेले अन त्यांना तिकडं त्रास झाला. हिंदीमध्येबोलत होता तो माणूस. ऐसा ऐसा हो गया, म्हणत होता. मी म्हटले, ऐसा करो आप, एक आधेघंटे के बाद, नितीन सरदेसाई को फोन करना उनको, वो आपका प्रॉब्लेम सॉल्व्ह करेंगे.साब अभी
इतनी छोटीसी चीज के लिये उनको कहा तकलिफ दू...

तुझ्या आयला, मला फोन करतो तू...

काय एकेक नग भेटतात तुम्हाला सांगतो ना. मला दोन मिनिटे सांगवेनायांना, म्हटलं सांगू, नको सांगू, साली आपलीच जातिय्ये मला कळेना. पण विविधक्षेत्रांमधले विविध लोकं, येत असतात, काही बोलत असतात. काही गोष्टी घडत असतात. सगळंकसं एखाद्या चित्रपटासारखं कसं थोडं थोडं रिलॅक्स होण्यासाठी काय काय गोष्टीलागतात ना, तसं तसं लोकं येत असतात. बाकी इतर पक्षाचा डोलारा माझ्याबरोबर तुम्हीहीसगळेजण सांभाळता आहात. पक्ष वाढतोय, मोठा होतोय, सगळ्या गोष्टी घडताहेत. हे सगळेघडत असताना काही गोष्टी प्रामुख्याने निवडणुकीच्या गोष्टी म्हणजे निवडणूकआयोगाच्या दृष्टीकोनातून काही गोष्टी आपल्याला तातडीने कराव्या लागतात. पक्षाचेविचार घरोघरी पोहोचले आहेत. प्रचंड पाठिंब्याने लोकं आपल्यामागे उभी राहिलेलीआहेत. पक्ष वाढवत असताना विविध टप्प्यांवरती स्पीडब्रेकर्स येतात. काही ठिकाणीजोरात गाडी न्यावी लागते, कधी तरी हळू गाडी न्यावी लागते. आणि तसे विषयही समोरयेतात. आता विषय समोर आल्यानंतर त्याच्यावरती बोलायचं नाही का?

परवा दिवशीचा आशाताईंचा विषय असेल, किंवा मग तो बिहारचा विषय असेल.आता आशाताईंच्या विषयामध्ये. काय बोललो मी? काय चुकीचं बोललो? एक आपल्या एबीपी माझा, त्याच्यावरती एकअसेच ते टॉक शो चालू असतात नाही का, तर असाच कुणीतरी मला फोन केला. बाळा नांदगावकरहोते, मी बघायला गेलो. तिकडे एक आपलेच परिचयातले पत्रकार आहेत. बोलायला लागले कीवाटतं रामदास आठवले बोलताहेत. तेही बोलायला लागले. खरं तर त्यांचं नाव आहे राज. पणमला कळत नाही ते असं का वागताहेत, त्यांचे वडीलही महंमद रफी यांच्याकडून गाणीगावून घ्यायचे.

आता महंमद रफी काय पाकिस्तानात रहायचे का? इथेच राह्यचे ना?

नंतर मी त्यांना, आपल्या परिचयातलेच आहेत, फोन केला, म्हटलं, मी बोललोकाय, सांगतोय काय, म्हणजे मला आशाताईंबरोबर त्या कार्यक्रमामध्ये त्या रुना लैलाआणि अजून कोण तरी त्या परवीन, अबिदा परवीन... ते तर तीन जजेस आहेत. त्यातले एकपाकिस्तानातले आहेत, एक बांगलादेशचे आहेत आणि आशाताई भारताच्या आहेत. यांच्यामार्फतयेणारे जे कलाकार आहेत, इथे येणारे कलाकार आहेत, या कलाकारांना आपण का प्रोत्साहनदेत आहोत? मीस्वतः एक कलाकार आहे, मला माहिती आहे, कला काय असते ती. विषय कलाकारांचा नाहीय्ये.उद्या ज्या वेळेला या सगळ्या लोकांना पैसे कमवायला जी जागा मिळते, तो भारत देशआहे. आपल्या देशात येऊन हे पैसे कमवतात. त्यांच्या देशात त्यांना कोणी विचारतदेखीलनाही. जर या सगळ्या लोकांना भारत बंद केला, जोपर्यंत तुमच्याकडल्या भारतविरोधीकारवाया बंद होत नाहीत, तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथे गाऊ देणार नाही, खेळू देणार नाही,हे जोपर्यंत आपण सांगत नाही... उद्या हेच सगळे कलावंत आणि हीच सर्व मंडळी ज्यावेळेलात्या पाकिस्तान सरकारवरती दबाव आणतील, की तुमच्यामुळे, तुमच्यामुळे या सगळ्यागोष्टींना मुकावे लागतंय, भारतामध्ये आम्हाला जाता येत नाही, आम्हाला तिकडेगेल्यानंतर शिव्या पडतात, लाज वाटते, हे जेव्हा त्या सरकारावरती, पाकिस्तानसरकारवरती दबाव आणतील ना, त्यावेळेला कदाचित ते सुधरेल, परंतु ती कुत्र्याची शेपटीआहे. तिच्या आयला कितीही नळकांड्यात घाला, ती काय सरळ होणार नाही. ती काय सरळहोणार नाही.

पण या लोकांना आपण का प्रोत्साहन देतो आहोत, ही गोष्ट तर आपण बघितलीपाहिजे, एव्हढाच तर माझा विषय होता. आणि आशाताईंसारखी एक व्यक्ती अन्यथा अनेकवेळामी त्यांना बघितलेले आहे की अत्यंत रोखठोक त्यांच्या भूमिका असतात, त्या मांडतात,असं मी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. मग इथे का नाही रोखठोक भूमिका नाही मांडली?हा माझा एक सवालआहे. मी कुठच्या प्रांताची नाही, मी भारताची आहे, मला राजकारण कळत नाही, मी एककलाकार आहे, मी समजू शकतो, तुम्हाला राजकारण कळत नाही. पण देशात काय चालल्यंय,हेही नाही कळत?

एकूण देशातली परिस्थिती काय? आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर त्यागोष्टींचं आकलन समजा नसेल, तर मी फक्त कलाकार आहे, असं बोलून नाही चालणार. हकनाकमाणसं मरताहेत इकडे आणि त्याच्यानंतर कसले दोस्तीचे हात आपण पुढे करतो आहोत? कशासाठी करतो आहोत?हा विषयहिंदु-मुस्लिम नाहीय्ये. हा भारत-पाकिस्तान आहे. हा भारत-बांगलादेश आहे. यादेशामधले जेव्हढे फिल्मस्टार्स आहेत, त्याच्यामधले तीन सुपरस्टार आहेत, ज्यांचीआडनावे खान आहेत. तरीही या देशाने ते मान्य केलेले आहेत. कोणी त्यांच्याकडे हिंदूकिंवा मुस्लिम म्हणून बघायला जात नाही, त्यांचे चित्रपटपण पहायला जातात. हिंदूधर्मातला समजा कोणताही पवित्र सण असेल, कुठचीही गोष्ट असेल, लग्न असेल समारंभअसेल, त्यावेळेला बिस्मिल्लाह खान यांची शहनाई वाजते. पारंपारिक इथे राहणारे,इतक्या वर्षांचे जे काही हिंदू-मुस्लिम संबंध असतील, हा विषय तो नाहीच आहे, परंतुया देशामध्ये जे काही घातपात, जे काही बॉम्बस्फोट आणि इतर गोष्टी ज्या घडवल्याजातायत त्याच्यानंतर त्यांच्या देशातील लोकांना, त्यांच्या कलावंतांना आणि इतरलोकांना इथे गोंजारायचं, चोंबाळायचं, कशासाठी? एवढ्यापुरताचा तो विषय होता.

पुढचा, ते सगळं बिहारचं.

स्साला, अंगात आल्यासारखं येतं ते सगळं. गंमत बघा, पण या एकाविषयावरती ते सगळे, सगळे पत्रकार, हिंदी चॅनेल्सचे आणि हे सगळे एकत्र येऊन बोलतातबघा. जणु काही त्यांचे अँकर्स, त्यांच्या अँकर्सनाच मी काहीतरी टोचलं होतं.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, प्रत्येकाच्या जिभेवर गोष्टी कशा यायला लागलात बघा. सगळेकसे एकत्र येतात, ते बघा. माझ्या वाक्याचा पुढचा मागचा संदर्भ न लक्षात घेता,सुरूच करतात. राज ठाकरेवर देशद्रोहाचा खटला चालवा...

ते भिकार कोण तिच्या आयला दिग्विजयसिंग, त्या काँग्रेसने शिव्या ठेवलेलंएक कार्ट आहे ते. बुजगावणं कुठचं ते. सगळीकडनं शिव्या खातंय, सगळीकडनं चापट्याखातंय, तरी मध्ये बडबडतंय, मध्ये बडबडतंय... विषय काही समजून घ्यायचा नाही, काहीबघायचं नाही, मागचापुढचा विचार करायचा नाही. ठाकरे कुटुंब मुळचं म्हणे बिहारचं. कुठूनकाढलं हे? मगदिग्विजयसिंगाचं कुटुंब हे सुलभ शौचालयातलं आहे? जिकडं जातंय तिकडं फळाफळा मुततंय... जागाबघायची नाही, माणसं बघायची नाहीत, काही बघायचं नाही. चार लोकं बघताबिघताहेत काहीनाही. फाळ... म्हणे बिहारमधनं आम्ही मध्यप्रदेशात कुठं धारला आलो. धार टाकायचीयांनी, आलो आम्ही म्हणे धारला.

बरं मी बोललो काय होतो? मी म्हणतोय काय? मी सांगतोय काय? ते काल केंद्रीय सचीव तेच सांगत होते नाकाल? पोलिसकुठेही कुठल्याही राज्यात जाऊ शकतात? बरं, ते जर सांगू शकतात, तर मग ते बिहारचे चिफसेक्रेटरी असं पत्र कसं पाठवू शकतात? बरं ते पत्रामध्ये पण एक गंमत. आर. आर. पाटीलम्हणताहेत, की असं काही सापडलेले नाही. असं काही कोणतंही पत्र आमच्याकडे आलेलेनाही. पोलिस कमिशनर सांगताहेत पत्र मिळालं. पोलिस कमिशनरना पत्र मिळालंय. आर. आर.पाटलांना माहिती नाही. मी हेच सांगतोय, यांना खातं कळत नाही, खातं कळत नाही. खातंसमजत नाही, यांनी राजीनामा द्यावा. यांना काहीही माहिती नसतं रोज काय घडतंय, कायचाललंय. काहीही माहिती नाही.

बरं म्हणे केंद्राला पत्र पाठवलंय. वर्तमानपत्राला बातमी आली होती कीनाही? मीबातमी कुठली वाचून दाखवली? माझ्या मनातली? उगाच बातम्या येतात? आणि त्याच्यानंतरतुम्ही म्हणता पोलिसांनी कायदा पाळला पाहिजे. अरे, कोण सांगतंय, ही राज्यं? कायदा पाळायच्यागोष्टी बोलताहेत? हे इथे माझ्याकडे कायदे आहेत. इंटरस्टेट मायग्रेशन अँक्ट आहे हा. एकाराज्यातून दुसऱ्या राज्यात जर तुम्हाला कामानिमित्त जायचं असेल, तर इकडच्या लेबरकमिशनरची तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. तुम्हाला नाव तुमचं रजिस्टर करावं लागतं.किती बिहारी लोकांनी महाराष्ट्रात आल्यानंतर स्वतःचं नाव रजिस्टर केलंय, दाखवामला. तुम्हाला पोलिसांना सांगावं लागतं, की आम्ही इकडे आलोय. कशासाठी आलोय? का आलोय?

उपदेश आम्हाला द्यायचे, या देशामधला कोणीही नागरिक कोणत्याहीराज्यामध्ये काम करू शकतो, कसाही जाऊ शकतो. मग कोणताही पोलिस जाऊ शकत? पोलिसही गेलापाहिजे. मी आपल्या महाराष्ट्रामधल्या पोलिसांशी बोलल्यानंतर तुम्हाला सांगतोय, कीअसं अनेकदा घडलेलं आहे, की आपल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी तिकडं इन्फॉर्मकेलंय, तिकडं सांगितलंय, की आम्ही अशा अशा व्यक्तीला पकडायला येतोय म्हणून आणि तोतिकडचा माणूस, जो कोणी गुन्हेगार असेल, त्याला तिथून गुल केलेले आहे.

काल ते बिहारचे एक आमदार बोलत होते. तसं नाहीय्ये, तसं नाहीय्ये, तसंनाहीय्ये. बिहारच्यामध्ये...

पहिली गोष्ट म्हणजे यांच्याकडेच सगळे जातात हं आश्रयाला. याच राज्यातसगळे आश्रयाला जाणार. मुळचा तो जोगेश्वरीचा ना तो, अमरजवान स्मारकाची नासधूसकरणारा. जोगेश्वरीचा. गेला कुठे? बिहारला. का? गुजरात माहित नव्हतं? कर्नाटक सापडतनव्हतं?तमिळनाडू कळत नव्हतं? बिहारलाच कसे जातात? तोच आमदार काल टेलिव्हिजनवर सांगत होता म्हणे,नागपूरला एका लहान मुलाचं अपहरण केलं, दोघाजणांनी, ते दोघजण त्याला बिहारला घेऊनगेले. बिहारलाच कसे जातात? हे सगळे गुन्हेगार शोधताना पोलिस अधिकाऱ्यांनाउत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि या सगळ्या भागामध्ये जावं लागतं, पोलिसांना. फक्तमहाराष्ट्राच्या नव्हे, बाकीच्याही. हे याच प्रांतामध्ये कसे काय जातात? हे त्याराज्यातल्या लोकांनी, जे कोणी सत्ताधारी आहेत, यांनी विचार करायला नको? की आपल्याकडून लोकंतिकडे बाहेर जाताहेत आणि बाहेर जावून धुडगूस घालताहेत आणि धुडगूस घातल्यानंतर परतआपल्या राज्यामध्ये येऊन लपताहेत.

हे केंद्र सरकारला कळायला नको? या गोष्टी आम्हाला सांगायला लागताहेत? आम्हाला बोलायलालागताहेत? आणिआम्ही बोलायला लागल्यानंतर म्हणायचं, बिहार आणि उत्तरप्रदेशबद्दल कोणी बोलायचंनाही. का? कुणीकाही बोलायचं नाही काही? देश म्हणजे काय बापाचा माल वाटला तुम्हाला? की यांनी कोणत्याही काही गोष्टी करायच्याआणि यांच्याबद्दल कोणी काही बोलायचं नाही? महाराष्ट्रामधले सगळे गुन्हे काढून बघा, यागुन्ह्यांमधले सगळ्यांत जास्ती गुन्हे कोणी केलेत बघा, आणि हे सगळे जातात कुठे तेबघा. कालपण तो अमरजवानची नासधूस करणारा तो माणूस त्याला जर पोलिसांनी पकडलं नसतं,तर तो तिथून नेपाळमार्गे बाहेर चालला होता. काय नाणेघाट आहे का तो? इकडून तिकडे बाहेरजायला?

तिकडून सगळे आतमध्ये येणार, बाहेरच्या देशांमधले लोक आतमध्ये येणार,यांना सगळ्या गोष्टी पुरविणार, त्याच्यानंतर हे महाराष्ट्रात येऊन इथे अड्डेबनवणार, यांचे मोहल्ले बनवणार आणि यांच्याबद्दल बोलायचं नाही. यांनी काहीही देशामध्येधुडगूस घातला तरी चालेल.

केरळ सरकारने काय केलंय बघा. केरळ सरकारने, केरळ पोलिसांनी त्याकेरळमध्ये येणारा प्रत्येक बाहेरचा जो माणूस आहे, त्याचं रजिस्ट्रेशन केल्याशिवायत्याला केरळामध्ये येता येणार नाही, असं तिथल्या पोलिसांनी ठरविलेलं आहे.महाराष्ट्र पोलिस कधी ठरविणार? महाराष्ट्र गृहमंत्री कधी ठरविणार? महाराष्ट्र राज्यकधी ठरविणार? या देशातलं एक राज्य समजा हा निर्णय घेऊ शकतं, तर मग दुसरं राज्य कानाही घेऊ शकत? मग ते जेव्हा हे निर्णय घेतं, तेव्हा का नाही त्याच्या नावानं बोंबलत? फक्त महाराष्ट्राच्याबाबतीत का बोंबलता? कारण महाराष्ट्राच्या बाबतीतले यांचे जे मनसुबे आहेत, ते वेगळे आहेत.

केरळामध्ये उपयोग नाही. कारण केरळामध्ये भाषाच कळत नाही. शहाळ्यासारखेसोलून काढतील. तिथं टिवटिव करणार नाहीत. पण तिथेही ज्यावेळेला एखादी गोष्ट घडते,त्यावेळेला ती चारही राज्ये कशी एकत्र येतात बघा. मग तो पाण्याचा प्रश्न असेल,किंवा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये ती चारही राज्ये पटकन एकत्र येतात. आमचामहाराष्ट्र का नाही एकत्र येत? महाराष्ट्रातले सगळे नेते का नाही एकसूरात बोलत?

काय चुकीचं बोललं होतो मी? कोणता गुन्हा केला मी? आणि माझं वाक्य काय होतं? जर बिहार सरकारने महाराष्ट्रपोलिसांवरती अपहरणाच्या केसेस जर समजा टाकल्या, तर मी महाराष्ट्रामधले जेव्हढेबिहारी आहेत, यांना घुसखोर ठरवून महाराष्ट्राच्या बाहेर काढीन, हे माझं वाक्यहोतं. जर ऐकायचाच नाही. फक्त तर ऐकायचं? आणि याच्यावरती खेळवत बसायचं? तुमच्या हिंदीचॅनेलची टीआरपी? बोलवायची सगळी कोंबडी आणि झुंझवत बसायची. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं?

विषय समजून घ्यायचा नाही. चॅनेलवाले यांचा नुसता खेळ करत बसणार.टीआरपी वाढवत बसणार. मधल्यामधल्या जाहिराती वाढवत बसणार. आज त्या हिंदी चॅनेलवाल्यांनासुद्धासांगतो, तुमचा खेळ थांबवा नाहीतर महाराष्ट्रातला तुमचा खेळ थांबवेन मी.

स्साला, काय गंमत वाटली काय तुम्हाला? वाट्टेल ती लोक बोलवायची, भांडणं लावतबसायची?तुम्हाला मराठी समजत नसेल, तर महाराष्ट्रातमधले जे मराठी रिपोर्टर आहेत, पत्रकारआहेत, त्यांना विचारून घ्या, हा काय बोलला? विनाकारण आपलं देशाचं वातावरण तापवत बसायचं.बरं, तो चीफ सेक्रेटरी जो काही बोलला, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही एकहीचॅनेलवाले. की हा असं कसं बोलला? तिकडे तुम्ही म्हणणार कायदा? मग कायद्याचाच वापरकरायचा असेल, तर आज या देशामध्ये इतके कायदे आहेत, वापरू काय? वापरू?

कायद्याच्या धमक्या देतात. या महाराष्ट्रामधल्या सगळ्या ठिकाणावरून.देशामधून जवळपास 48 रेल्वे ट्रेन्स रोज महाराष्ट्रामध्ये येताहेत. कोण येताहेतआतमध्ये?उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड या भागातून 48 ट्रेन्स रोज येताहेत. कुठं जाताहेत? मुंबईत येताहेत,ठाण्यात जाताहेत, पुण्याला जाताहेत, कोल्हापूरला जाताहेत. कोण त्या गाड्यांमधूनउतरतंय? कुठूनकोण येतंय, काय करतंय? माहिती नाही? आणि त्याच्यानंतर पोलिसांच्यावरती दोष द्यायचे? एखादी घटना घडलीतर, गोष्ट घडली तर?

या देशामधला कोणीही माणूस कुठेही जाऊन राहू शकतो, पण कसाही नाही.तिथल्या जर समजा अँडमिनिस्ट्रेशनला, तिथलं जे पोलिस खातं आहे, तिथलं जे सरकार आहे,तिथल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांना समजा माहिती नसेल आलीत माणसे कोण? ते तरी कसा कंट्रोलठेवणार या सगळ्या गोष्टींवरती?

त्याच्यामुळे मला हिंदी चॅनेलवाल्यांना आणि बाकीच्या चॅनेलवालवरतीबकबक करणारी जी लोकं आहेत, त्यांना फक्त इतकंच सांगायचंय, माझा पारा चढू देऊ नका,तुम्ही लोकांनी. मी जे बोलतोय, ते पहिले नीट समजून घ्या. समजत नसेल, तर विचारूनघ्या. आणि विचारूनही घेता येत नसेल, तर पुढचं मी काय करेन हे आपल्याला चांगलीकल्पना आहेच या गोष्टीची.

आता सुरू असतील, ब्रेकींग न्यूज, राज ठाकरे ने दी चॅनेलवालोंको धमकी,धमकी, धमकी, धमकी... सुरू.

गोळा करा जाहिराती गोळा करा. जाहिराती गोळा करा, पैसे गोळा करा, मगधमकी, धमकी, धमकी. ये देखो कैसे बोले. हं, हं, हं... तिच्याआयला सारखं हेच दाखवतबसायचं. एखादा पडला की, तंगड्या वर, तंगड्या वर, तंगड्या वर... चालु आपलं यांचे.सर्कल दाखवायचं, ये देखो कैसे गिरा... सारखं तेच. बालीश स्साले...

देखो चॅनेलवालों को स्साला बोला...

च्यायला यांनी तमाशे करत बसायचे देशभर, आणि लोकांनी बकबक करत बसायची.मला जेव्हढं सांगायचं होतं, तेव्हढं मी सांगितलंय. कळलं असेल, तर तुम्ही या हिंदीचॅनेलवाले हं, मी बोलतेय ते. मराठी चॅनेलसाठी नाही. मराठीवाल्यांना सगळं समजतं.इंग्लिशवाल्यांचा संबंधच नाही. ते चंद्रावरतीच असतात. ते काहीतरी वेगळ्याचलेव्हलला. ओबामा, बिमामा वगैरे चालू असतं. इथं देश पेटलाय. ओबामाच्या इलेक्शनबद्दलयांना चिंता पडलेली असते. त्यांना काही देणंघेणं नाही. या सगळ्या लोकांना काहीदेणंघेणं नसतं.

तो वेगळाच एक विषय आहे, हेरिटेचजा. काय पण एकेक आपल्याकडचे लोक खांदेलावतात. त्या सगळ्या शिवाजी पार्क, बीटीटी चाळ, इमारती बघितल्यात? परळच्या? हेरिटेज आहे म्हणे.काय स्साला कोण डोकं लावतं, कोण काय विचार करतं, काय कशाचा कशाला पत्ता नाही.महानगरपालिकेची इमारत, सीएसटी स्टेशन, त्या फोर्टमधल्या इतर इमारती, बघितल्यानंतरचकळतं, हेरिटेज आहे. अजून 500 वर्षे काही होणार नाही याला. त्या ब्रिटिशांनीबांधल्यात. असं वाटतं का हो, बीटीटी चाळीत गेल्यावर, की 500 वर्षे याला काही होणारनाही?

कुणाला तरी चार टाळकी बसवायची, कुणाला तरी एक झटका येतो, त्याझटक्यामध्ये कुणाला तरी हेरिटेज बसवायचं, पण मुख्यमंत्र्यांना यावरती स्टे द्यावाचलागेल. ही असली लफडी चालायची नाहीत. त्याच्यामध्ये काहीतरी नवीन. राजकारण. मराठीमाणूस उद्ध्वस्त होईल. शिवाजी पार्क या भागातला. कसा उद्ध्वस्त होईल? तो राहतोय तिथे.दुसरा येणार येऊ शकणार नाही. पण तो आहेच की. त्याच्या मागे लगेच वेगळे राजकारण.असो. मला त्या भानगडीत जायचं नाही.


- - राज ठाकरे

wwww.raajmat.wordpress.com

Sanjeev Oak's Blog

Blog Stats
  • 11373 hits