Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

‘राज’गर्जना

September 01, 2012

21 तारखेला आपला मोर्चा झाला. मोर्चानंतर मी फार काही बोललो नाही. कारण एखादी अशी कृती झाल्यानंतर आपण फारसं काही बोलावं असं मला वाटत नाही. बऱ्याच गोष्टी त्यामध्ये झाल्या. मोर्चा असा होता, तसा होता. मोर्च्यानंतर असं झालं, तसं झालं.

कुठपर्यंत झालं, तर राज ठाकरेचे वाढलेले केस, राज ठाकरेचा गॉगल…

हे काही चर्चेचे विषय आहेत काय? बरं केस माझे. मी कापीन नाही तर वाढवीन.

त्यादिवशी मी दाढी वाढवली. लगेच सुरू, राज ठाकरेचा नवा लुक.

माझे प्रॉब्लेम मला माहितीत ना. बरं ती उगवती, येतेये, बरं, येऊ दे ना, काय फरक पडतो? मी मध्ये टॉयफॉईडने आजारी होतो. आजारी असताना काही ताकद नव्हती. पडून असायचो, झोपून असायचो. त्याच्यामध्ये ती दाढी वाढली. ती औषधे चालु होती. त्या औषधांमुळे चेहऱ्यावर पुळ्या आल्या. औषधांमुळे एक इथे आली, एक इथे आली. बरं ती वाढलेली दाढी घाण दिसायला लागली. ती सगळी काढली. ती काही करता येत नाही. म्हटले घरीच आहे, कोण थोबाड बघायला येणार आहे. म्हणून म्हटलं वाढवू. लगेच सुरू.

बरं झालं कसं, त्याचवेळी मुख्यमंत्र्यांशी टोलची बैठक होती. आजारपणानंतर जाता नाही आलं. जरा बरा झालो, मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली. म्हणून जाऊन आलो. तसाच गेलो. कशासाठी गेलो होतो. लगेच सुरू नवा लूक.

नव्या लूकमागे पण काहीतरी आहेच. यांनी दाढी वाढवली, यांनी दाढी वाढवली.

आयला, माझं मी काही पण वाढवायचं नाहीच काय?

साला काही करायलाच नको.

काळी पॅण्ट घातली, पांढरा शर्ट घातला. एकानं लगेच विचारले. पक्षाचा युनिफॉर्म व्हायला लागला काय? म्हटलं. साला काहीतरी घालून तर फिरतोय हे तरी नशीब समजा. नशीब, त्या सुपरमॅनसारखा फिरत नाही. पॅण्टवर अंडरवेअर घालून फिरायला.

विषय काय मूळ विषय काय. प्रत्येकाचा दृष्टीकोन असतो. काय बोलणार.

त्यादिवशीचा मोर्चा झाल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या गेल्या, चॅनेलवरती दाखवल्या गेल्या. प्रत्येकाने आपापले तर्क मांडले. मग आता काही राष्ट्रीय स्तरावरती राज ठाकरे पोचले. राष्ट्रीय स्तरावरती पक्ष पोहोचला. काय करू त्याचे?

आपला पक्ष्याचे नाव काय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. म्हणजे बाहेरच्या राज्यांमध्ये जायचा प्रश्नच येत नाही. पहिल्यांदाच सांगितले होते, आजही सांगतो, महाराष्ट्राची बाऊंण्ड्री सोडली, तर मला बाकी कशातही इंटरेस्ट नाही. राष्ट्रीय पक्ष करण्यात किंवा राष्ट्रीय नेता होण्यात तर बिल्कुल नाही. मला स्वप्नंही पडत नाही. बिल्कूल नाही.

जेवढे राष्ट्रीय नेते झाले, ते सगळे फुकट गेले. जेव्हढे दिल्लीत जातात ते सगळे फुकट जातात. उपयोगाचे राहत नाहीत.

आपण भले, आपला महाराष्ट्र भला. आपल्या महाराष्ट्रातील माणसं भली. पण हे सगळे करत असताना, मला जे जे काही रायटप आले. मोर्चा संदर्भात आले, अनेक आले. वेगवेगळ्या लोकांनी आपापली मते मांडली.

मागे जेव्हा आपली आंदोलने झाली, तेव्हा हेच सगळे उठले होती. हिंदी चॅनेलवाले, इंग्रजी चॅनेलवाले.

मी त्यादिवशीही मोर्चात सांगितले होते. हा इथल्या लोकांचा प्रश्न नाही. कारण जो स्थानिक माणूस असतो, ज्याची रोजीरोटी इकडे असते, ज्याच कुटुंब इकडे असते, सगळ्या गोष्टी इथे असतात. तो पोलिसांवरती हात टाकत नाही. कारण त्याचा त्रास त्याला होतो. हे सगळे प्रकरण झाले असताना, मोर्चा झाला. मी तेव्हाच सांगितले होते, हे सगळे बांगलादेशी, पाकिस्तामधून आलेले आहेत. बाहेरच्या राज्यांमधून आलेले लोक आहेत.

तो अमरजवान स्तंभ तोडणारा कोठे सापडला? बिहारमध्ये सापडला.

आमच्या पोलिसांनी तिथे जाऊन त्याला पकडला.

मी पूर्वीपासून सांगतोय, सतत जे सांगतोय की सगळे बाहेरून महाराष्ट्रात येतेय, आणि हा महाराष्ट्राला सर्वात मोठा धोका आहे. हे कुठे कुठे पसरलेले आहेत. पोलिसांची शस्त्रे घेऊन गेली. बुलेटसकट घेऊन गेले. ती दोन पोरे कुठे मिळाली. ती शस्त्रे कुठे मिळाली, मुंब्रामध्ये मिळाली. गर्दी इतकी झाली की बाकीचे सटकून गेले. पोरे हाताला लागली नाहीत. कारवाई कधी करणार?

काय ते आर आर सांगतात, अरुप पटनाईक सांगतात. ईदनंतर. रमझान संपूदेत कारवाई करू. ईदनंतर कारवाई करू?

टोलचं आंदोलन असूदेत नाहीतर इतर आंदोलन असू देत. त्यावेळी विचार केला का सरकारने? तुमच्यासारख्या माझ्या सहकाऱ्यांना तडीपाऱ्या लावल्या, जेलमध्ये पाठवले, लाठीमार केला, त्यावेळी विचार केलात? दिवाळी आहे, गणपती आहे का नवरात्र आहे? तेव्हा सण नाही विचार केला, आता सणांचा विचार करताय? दंगेखोर असतील, दरोडेखोर असतील त्यांना कसला आलाय धर्म? त्यांच्यावर कारवाई करताना तुम्हाला सण आठवतात?

आणि म्हणून माझे जे टाळके फिरले ते असल्या गोष्टींमुळे. हे सगळे बाहेरून येणारे आहेत. त्याचा ताप आपल्याला होणार आहे. 11 ऑगस्ट ही फक्त झलक होती झलक.

अजूनही खंबीर निर्णय नाही, कठोरपणे निर्णय घ्यायला तयार नाहीत. या सगळ्यांना कारणीभूत असणारे आर आर पाटील बसलेत. आजही आमची मागणी आहे, की आर आर पाटलांनी राजीनामा दिलाच पाहिजे कारण त्यांचे ते काम नव्हे. सगळ्यात धक्कादायक काय असेल.

मला आमच्या पत्रकारबांधवाने मला एसएमएस केला. एसएमएस केल्यावर मी फोन केला. मला फोनवरती ती गोष्ट कळली. गंमत बघा, म्हणजे आपल्या उत्तरप्रदेश, बिहार याप्रकरणाच्यावेळी जी आंदोलने चालू होती. त्या आंदोलनच्यावेळी जे पेटले होते. सगळे हिंदी आणि इंग्रजी चॅनेलवर सगळे जेव्हढे पेटले होते ना,

काल का नाही रे पेटलात?

बिहारमधला चिफ सेक्रेटरी, बिहारचा. या बिहारच्या चिफ सेक्रेटरीने महाराष्ट्र पोलिसांना वॉर्निंग दिली आहे. हा आजचा फक्त डीएनए आहे. बाकी कुणी दखलपण नाही घेतली. किती मोठी बातमी आहे. त्याची दखलही घेत नाही तुम्ही? आज सगळे जे काही गुन्हे घडताहेत, महाराष्ट्रात घडताहेत, प्रत्येक पोलिसांना जाऊन विचारा, त्यांना शोधायला जावं लागतं, उत्तरप्रदेशमध्ये, बिहारमध्ये, झारखंडमध्ये. लहान मुलांच्या अपहरणापासून ते खुनांपर्यंतचे आरोपी तिकडे जाताहेत

आणि आमचे कमिशनर हे काय सांगत होते? इद जाऊ देत, मोहरम संपू देत… मोहरम नाही, काय रमझान? रमझान संपू देत. रमझान संपेपर्यंत थांबतील का ही लोकं? हे सगळे तोडफोड करून, या सगळ्या गोष्टी करून परत त्या ट्रेनमधून निघून जातात, तिकडे जातात. आणि परत त्यांना शोधायला आपल्या महाराष्ट्र पोलिसांना तिकडं जावं लागतं. त्याच्यानंतर बिहारचे चिफ सेक्रेटरी सांगतात. काय सांगतात. की याच्यापुढे महाराष्ट्र पोलिसांना तिकडे यायचं असेल, तर आमच्या परवानगीशिवाय येता येणार नाही. आणि जर समजा तुम्ही आलात, तर आम्ही तुमच्यावर लिगल अँक्शन घेऊ?

एक देश आहे, हा एकसंघ राहिला पाहिजे, हे असले ढोस मला देता ना सगळे?

मी त्या बिहारच्या चिफ सेक्रेटरीना सांगतोय आत्ताच…

हे सगळं तुमच्या राज्यांमुळे वाढलेली गुन्हेगारी आहे. आणि महाराष्ट्राचे पोलिस जर तिकडे जाऊन त्या गुन्हेगारांना पकडण्यात तुम्ही जर अडथळे आणलेत, तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक बिहारी हा घुसखोर आहे म्हणून आम्ही हाकलून देऊ बाहेर.

जर तुम्ही अशा प्रकारची अँक्शन घेतलीत आमच्या महाराष्ट्र पोलिसांवरती…. गुन्हे गुन्हे तुमच्या लोकांनी करायची, लिगल अँक्शन आमच्या पोलिसांवर करणार? महाराष्ट्र पोलिसांवर करणार?

आणि याच्यावर चॅनेल बोलत नाही? एकही वर्तमानपत्र लिहित नाही? कोणी त्याला सांगायला जात नाही? उपदेशाचे सगळे डोस मला?

देश एक राहिला पाहिजे, एकसंघ राहिला पाहिजे… परवा दिवशी सुप्रिम कोर्टाने ज्या कसाबला फाशीची शिक्षा दिली… सुप्रिम कोर्टाने सांगितले, हा पाकिस्तानातला आहे. हे सगळं बाहेरून येतंय, हे पोसले जाताहेत या सगळ्या राज्यांमधून आणि त्यांचे महत्त्वाचे अधिकारी सांगताहेत की तुमच्यावर लिगल अँक्शन घेऊ आम्ही? जर तुम्ही इथे पकडायला आलात तर?

महाराष्ट्र पोलिसांनी काय याच्या अगोदर सांगितले नसेल? पण यांचीच लोकं यांना पळवून लावतात जिथे आहे तेथून पळवून लावतात. हाताला सापडू देत नाहीत. इतकी कठीण, अशा प्रकारची रिस्क घेऊन ज्यावेळी महाराष्ट्र पोलिस तिकडे जातात आणि हे लोकं शोधतात त्यांना शाबासकी देण्याऐवजी तुम्ही या असल्या गोष्टी करता? का बोलत नाही आता नितिशकुमार? त्यांचे चिफ सेक्रेटरी ना, मग का बोलत नाहीत आता? कुठे गेले दिल्लीतले नेते? कुठे गेले महाराष्ट्रातले नेते? का नाही तुटून पडले या चिफ सेक्रेटरीवरती?

तिथे नाही त्यांची हिंमत होणार. हे उपदेश, हे डोस फक्त महाराष्ट्राला पाजायचे. देश एकसंघ ठेवा, देश एकत्र ठेवा, देश तोडण्याची भाषा करू नका. या देशामधला नागरिक कोणीही कोठेही जाऊन राहू शकतो. मग कुठचेही पोलिस कुठेही जाऊन आरोपी शोधू शकतात ना? तुमचा नागरिक जाऊ शकतो रे, अं… यांचा नागरिक कुठच्याही राज्यात जाणार, धुडगूस घालणार, त्या संपूर्ण राज्याची संस्कृती बिघडवणार.

मग पोलिस का नाही जाऊ शकत? पोलिस गेल्यावर त्यांच्यावरती लिगल अँक्शन घेणार? एकदा घेऊनच दाखवावी यांनी. एव्हढे सगळे प्रकार चाललेत आज. महाराष्ट्रामध्ये चालल्येत, देशामध्ये चालल्येत. इतके बॉम्बस्फोट आणि इतक्या सगळ्या गोष्टी घडताहेत, पुण्यामध्येही घडल्या. प्रत्येक शहरा-शहरांमध्ये या सगळ्या गोष्टी होताहेत.

आणि काल ते प्रकरण झाले आशा भोसलेंचं.

त्या पाकिस्तानी कलावंतांना इकडे येऊन नाचवताहेत, गायला लावताहेत. आणि आशाताई काय म्हणताहेत, अतिथी देवो भव, मग कसाब पकडला त्यावेळी का नाही बोललात, ये बाबा ये, अतिथी देवो भव, अतिथी देवो भव, ये.

हा देश कसा उद्ध्वस्त होईल याच्यासाठी वाट पाहणारे पाकिस्तानसारखे आणि बांगलादेशसारखे देश आणि त्यांच्या कलावंतांना तुम्ही मोठे करताय?

आशाताईंबद्दल पूर्ण आदर आहे, याच्याबद्दल काही प्रश्नच येत नाही. एव्हढे मोठे कलावंत या देशाने दिलेले आहेत. जी काही आमची आदराची स्थाने आहेत त्या आदराच्या स्थानांमध्ये आशाताई येऊन बसतात. अहो आशाताई, तुमचे वय पाहता तुम्ही आम्हाला उपदेश द्यायला पाहिजेत. कसं वागायला पाहिजे, आता ते आम्ही तुम्हाला द्यायचे? आम्ही तुम्हाला सांगायचं? बरं खरं कारण काय सांगा ना एकदा. अतिथी देवो भव आहे, की पैसे देवो भव आहे?

असा आवाज, अशी गायकी जगाच्या पाठीवर कुठे मिळणार नाही. लतादिदी, आशाताई ही केव्हढी मोठी रत्ने या महाराष्ट्राने दिली या देशाला, जगाला. आणि आशाताई तुम्ही हे करावं? प्रत्यक्ष भेटल्यावर तुम्ही सावरकरांच्या गोष्टी सांगता. सावरकरांनी कसा त्याग केला, स्वातंत्र्यवीरांनी काय केलं. सावरकरभक्त म्हणवता ना स्वतःला, हे सावरकरांना तरी पटलं असतं का, तुम्ही आज जे काही करताय ते? ही त्यांच्याही विचारांना तिलांजली नाही का?

तुम्ही आमच्यासमोर आदर्श घालून द्यायला पाहिजे होते की हे चॅनेल जर समजा पाकिस्तानी कलावंतांना तिकडे आणणार असेल, तर मी त्या चॅनेलवर काम करणार नाही, हा रोखठोकपणा आशाताईंनी एरव्ही दाखवतात, तो आता दाखवायला पाहिजे होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मला असं वाटतं की मी ती वाळिब्यांच्या का कुठल्या पुस्तकात वाचली होती. अंदमानला आतमध्ये, तिकडे सगळ्यांवर अत्याचार चालू होते, स्वातंत्र्यवीरांवर चालू होते. अत्यंत वाईट अवस्थेमध्ये राहत होते. त्यांचा तो तिकडचा जनरल होता, त्याचं नाव होतं, जनरल बारी. तो जेलर, तिथला जो जेलर होता, तो जेलर बारी. त्या बारीच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत. कारण जी पत्रे बाहेरून यायची, आणि जी आतून बाहेर जायची, त्यांचे डॉक्यूमेंटेशन त्याच्यामध्ये असायचे. तो लिहून ठेवायचा.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिलं महायुद्ध झाल्यानंतर असं म्हटलं होतं, की दुसरं महायुद्ध घडणार. द्रष्टाच होता माणूस. दुसरं महायुद्ध घडणार. आणि दुसरं महायुद्ध घडेल, ते जर्मनी घडवेल. आणि ज्यावेळेला ही घटना घडली. हिटलरने ही सगळी सुरुवात केली, त्यावेळेला आनंदाने सावरकरांनी टाळी मारली, जेलमध्ये. की आता हा हिटलर या ब्रिटिशांचा कणा उद्ध्वस्त करणार. आणि आपल्याला, आपल्या देशाला परत स्वातंत्र्य मिळणार. म्हणून त्यांनी एक पत्र लिहिलेले आहे. की हे सगळं झालेले असताना त्याच्यानंतर त्यांना एका वर्तमानपत्रात एक बातमी कळली. तुर्कस्तानचा शेख, तिथला राजा जो कोणी होता, त्याने हिटलरला पाठिंबा दिला. गंमत बघा. स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेलमध्ये कुणी ठेवल्यंय, ब्रिटिशांनी. हाल कोण करताहेत, ब्रिटीश हाल करताहेत. आणि ज्यावेळेला त्यांना ही बातमी कळली की, तुर्कस्तानाचा जो शाह आहे त्यांनी हिटलरला पाठिंबा दिलाय, त्यावेळेला त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे, की ब्रिटिशांना पाठिंबा द्या. कारण हा तुर्कस्थानचा शेख जर्मनीची मदत घेऊन भारतामध्ये येईल, अफगाणीस्तानमार्गे. त्यावेळेला काही पार्टिशन झालेलं नव्हतं. आणि भारतामध्ये येईल. आणि या भारतामध्ये राहणारे, तिथले जे मुसलमान आहेत, त्यांना हा एकत्र करेल, हा भविष्यात देशाला धोका ठरेल. हे त्यांनी लिहून ठेवलं होतं, त्यावेळेला. त्यातला एक मोठा पार्ट गेला, तो झाला पाकिस्तान. आणि हा धोका ठरेल याच्यासाठी आज आपण ब्रिटिशांना पाठिंबा दिला पाहिजे.

अहो हाल जो सहन करतोय, ज्यांच्यामुळे तो हाल सहन करतोय माणूस त्यांच्या फक्त एक विचार आला मनात की यांना पाठिंबा दिला, तर धोका आपल्या देशाला उद्भवेल, म्हणून तुम्ही ब्रिटिशांना जरी ते माझ्यावरती अत्याचार करत असले, तरी आता हिटलरला पाठिंबा देऊ नका. असा जो माणूस विचार करतो, त्या विचारांचे दाखले आशाताई तुम्ही देता, आणि तुम्ही आज त्या कलर्सच्या का कुठल्या चॅनेलवरती पाकिस्तानी कलावंतांना इकडे आणून तुम्ही काय सांगताहेत आम्हाला? येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही काय सांगणार आहात?

आदर्श तुम्ही घालून दिले पाहिजेत. रोखठोक भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. उद्या जर तुम्ही या गोष्टी सांगितल्यात की नाही या कलावंतांना… अहो, या देशामध्ये काय कलावंत कमी आहेत? काय गायक कमी आहेत, की काय कमी आहे? काय कमी काय आहे या देशामध्ये? इथल्या कलावंतांना गोंजारा ना, इथल्या कलावंतांना मोठे कराना… इथे राहतात त्या कलावंतांचे काय करायचे असेल ते करा… बाहेरच्या देशांमधल्या कशाला आणता… तो देश म्हणजे कोणता, जो आपल्या देशावर टपून बसलाय त्या देशाबद्दल बोलताय आपण?

आणि ही भिकारडी चॅनेल ती, कलर-बिलरसारखी. या हरामखोरांना टीआरपी पाहिजे. टीआरपी. म्हणून इथे नाही शूटिंग केले, दुबईत केलंय शूटिंग.

अरे, शूटिंग दुबईत कराल. ऑफिस तर इकडेच आहे ना…

आत्ता जे झाले ते झाले. परत अशा प्रकारचा कार्यक्रम कोणत्याही गोष्टींसाठी कुठल्याही चॅनेलने जर समजा केला, तर त्याच्यानंतर जे काही त्यांचं बरं-वाईट होईल, याला जबाबदार आम्ही नसणार… सरकार असेल. सरकारने आजच या सगळ्या लोकांना समज द्यावी, की असले धंदे पहिल्यांदा बंद करा. लोकांनी इकडे फुकटच्या फाकट मरायचं यांनी केलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये…

प्रत्येक घरामध्ये एक धाकधूक लागलेली असते, माझा नवरा कामावरती गेलाय, तो संध्याकाळी परत येईल की नाही, का ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होऊन मरेल, त्याच्यामध्ये…

या असल्या धाकधुकीमध्ये संपूर्ण आयुष्य काढणारा हा देश आणि जो याच्यावरती लादतोय, इतकी संकटं लादतोय, त्या देशातील लोकांना आपण मोठं करतो आहोत. हाच, हाच विचार आहे ना, हाच विचार देशाला खड्ड्यात घालणार. या असल्याच गोष्टी, हे जे सोडून द्या, जाऊ द्या, चालतंय रे, बघू, आता तर काही नाही ना या असल्या विचाराने हा देश साधारणपणे 1292-93मध्ये अल्लाउद्दीन खिलजी आला, भारतावरती आक्रमण करण्याकरिता आला, त्याच्यानंतर या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? ज्यावेळेला आमचा हा राजा जन्माला आला. त्याच्यानंतर परत पारतंत्र्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. इतकी वर्षे, इतका वेळ कोणत्या गेला? जाऊ द्या, आपल्याला काय त्याचं, आपल्याला तर काय चटका बसत नाही ना, त्रास होत नाही ना, मरू देत, बाकीचे लोकं मरताहेत ना. विसरून जातो आपण.

एखादी घटना झाली, की विसरून जायला होतं आम्हाला. लक्षातही राहत नाही. पुढची घटना झाली, की परत ताठ, आठवडाभर, मग नंतर परत यांच्या मेणबत्त्या. मऊमऊमऊ वितळायला सुरुवात होते. या सगळ्या विचारांसाठी तुम्ही सतत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे. कुठे कुठे अशा घटना घडताहेत, कुठे कुठे अशा गोष्टी घडताहेत, याचं मी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहे. एका जोशात, एका जोमात काम करताना, मी म्हणून तुम्ही काम करायचं आहे. कुठंही लोकांना न दुखवता काम करायचं आहे.

-जय हिंद, जय महाराष्ट्र

- राज ठाकरे

Sanjeev Oak's Blog

Blog Stats
  • 22303 hits