Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

राजगर्जनेनंतरची कोल्हेकुई

September 01, 2012

राज ठाकरे यांनी बिहारींना घुसखोर म्हणून हुसकावून लावू, असा सज्जड इशारा देताच, सगळे बिहारी नेते पक्ष विसरत एकत्र येत, राज ठाकरेंच्या विरोधात कोल्हेकुई करत असताना महाराष्ट्रातील भले-भले नेते मात्र, तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसलेले शरम वाटणारे चित्र शनिवारी संपूर्ण देशाने पाहिले.

राज ठाकरे जे काही बोलले, ते महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनातील भावना व्यक्त करणारेच व्यक्तव्य होते. 11 ऑगस्टला मुंबईत झालेल्या हिंसाचाराला बाहेरून येणारे लोंढे कारणीभूत आहेत, हे त्यांनी त्या वेळी काढलेल्या निषेध मोर्च्याच्या वेळी जाहीरपणे सांगितले होते. त्यांच्या विधानाला पुष्टी देणारी घटना दरम्यानच्या काळात घडली. अमर जवान या राष्ट्रीय स्मारकाची तोडफोड करणारा मुस्लिम धर्मांध बिहार येथेच सापडला. त्याला महाराष्ट्र पोलिसांनी अटक करून मुंबईत आणले, म्हणून बिहारींचे पित्त खवळले. त्यांच्या चिफ सेक्रेटरींनी महाराष्ट्राला पत्र लिहीत यापुढे असा प्रकार घडल्यास पोलिसांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्राला धमकावले होते. यावर कोणाही स्वाभिमानी मराठी माणसाचा संताप होणे हे नैसर्गिक होते. मात्र, सत्ताकारणासाठी वाट्टेल ते, हे धोरण बाळगलेल्या मराठी नेत्यांनी, स्वाभीमानाच्या नावावर पक्ष काढून पुन्हा काँग्रेसच्या गळ्यात गळा घालून मनसोक्त सत्ता उपभोगणारे दिल्लीकर नेतेही मौन बाळगते झाले. अगदी दिल्लीवरून महाराष्ट्रात आयात झालेले महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही काहीही प्रतिक्रिया न देता, केवळ सर्व चॅनल्सवर बिहारी नेत्यांसह अबु आझमीसारखा कट्टर धर्माभिमानी राज ठाकरेंच्यावर वैयक्तिक पातळीवर टिका करत असताना, केवळ बघ्याची भूमिका घेते झाले. अगदी प्रसारमाध्यमाच्या एका प्रतिनिधीने एका वाहिनीवर राज ठाकरे यांच्याविरोधात गरळ ओकण्याचेच काम केले.

कोण म्हणतंय, राज ठाकरे देशद्रोही आहेत. राज ठाकरे देशद्रोही? मग तुम्ही कोण? ज्या अमर जवान स्मारकाची तोडफोड करणारा धर्मांध बिहारमध्ये सापडतो, त्याला पोलिसांनी कसोशीने तपास करून ताब्यात घेतले म्हणून पोलिसांची पाठ थोपटण्याऐवजी, या बिहारी नेत्यांनी महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात केलेली दादागिरी देशद्रोही नव्हे काय? राज ठाकरे यांच्या विरोधात कोल्हेकुई करण्यापेक्षा असा धर्मांध बिहारमध्येच कसा सापडतो, याचा शोध त्यांनी घेतला असता, तर त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागतच केले असते.

अबु आझमीसारख्या हिरवी झूल पांघरलेल्या नेत्याकडून वेगळ्या काही प्रतिक्रियेची अपेक्षाच नाही. त्यांचा राग हा धर्मांध बिहारसारख्या राज्यात नेवून लपवला, तरी मुंबई पोलिसांना सापडला म्हणून होता, असेच जाणवत होते. तसे असेल, तर अबू आझमीविरोधात सगळ्या महाराष्ट्रातील जनतेने एकत्र येत, त्याला महाराष्ट्रात प्रवेशाची बंदीच केली पाहिजे.

राज ठाकरे जे बोलले होते, ते सप्रमाण सिद्ध झाल्यानेच बिहारी नेत्यांच्या पोटात कळ उठली आहे.

राज ठाकरे यांच्यावर टिका करताना, पुन्हा एकदा मुंबई ही महाराष्ट्राची जहागीर नव्हे, मुंबईवर साऱ्या देशाचा हक्क आहे, असे विधान केले गेले आहे, त्याचा विचार सर्वांनीच करायला हवा.

राज ठाकरे काय म्हणाले होते,

“देश एक राहिला पाहिजे, एकसंघ राहिला पाहिजे... परवा दिवशी सुप्रिम कोर्टाने ज्या कसाबला फाशीची शिक्षा दिली... सुप्रिम कोर्टाने सांगितले, हा पाकिस्तानातला आहे. हे सगळं बाहेरून येतंय, हे पोसले जाताहेत या सगळ्या राज्यांमधून आणि त्यांचे महत्त्वाचे अधिकारी सांगताहेत की तुमच्यावर लिगल अँक्शन घेऊ आम्ही? जर तुम्ही इथे पकडायला आलात तर?

महाराष्ट्र पोलिसांनी काय याच्या अगोदर सांगितले नसेल? पण यांचीच लोकं यांना पळवून लावतात जिथे आहे तेथून पळवून लावतात. हाताला सापडू देत नाहीत. इतकी कठीण, अशा प्रकारची रिस्क घेऊन ज्यावेळी महाराष्ट्र पोलिस तिकडे जातात आणि हे लोकं शोधतात त्यांना शाबासकी देण्याऐवजी तुम्ही या असल्या गोष्टी करता? का बोलत नाही आता नितिशकुमार? त्यांचे चिफ सेक्रेटरी ना, मग का बोलत नाहीत आता? कुठे गेले दिल्लीतले नेते? कुठे गेले महाराष्ट्रातले नेते? का नाही तुटून पडले या चिफ सेक्रेटरीवरती?

तिथे नाही त्यांची हिंमत होणार. हे उपदेश, हे डोस फक्त महाराष्ट्राला पाजायचे. देश एकसंघ ठेवा, देश एकत्र ठेवा, देश तोडण्याची भाषा करू नका. या देशामधला नागरिक कोणीही कोठेही जाऊन राहू शकतो. मग कुठचेही पोलिस कुठेही जाऊन आरोपी शोधू शकतात ना? तुमचा नागरिक जाऊ शकतो रे, अं... यांचा नागरिक कुठच्याही राज्यात जाणार, धुडगूस घालणार, त्या संपूर्ण राज्याची संस्कृती बिघडवणार.

मग पोलिस का नाही जाऊ शकत? पोलिस गेल्यावर त्यांच्यावरती लिगल अँक्शन घेणार? एकदा घेऊनच दाखवावी यांनी. एव्हढे सगळे प्रकार चाललेत आज. महाराष्ट्रामध्ये चालल्येत, देशामध्ये चालल्येत. इतके बॉम्बस्फोट आणि इतक्या सगळ्या गोष्टी घडताहेत, पुण्यामध्येही घडल्या. प्रत्येक शहरा-शहरांमध्ये या सगळ्या गोष्टी होताहेत.”

महाराष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्नच ऐरणीवर आलेला असताना, सगळी प्रसारमाध्यमे मात्र राज ठाकरे यांच्यावरच तुटून पडलेली दिसून येत आहेत. धर्मांध अबू आझमीसह बिहारी नेत्यांनी एकत्रितपणे कोल्हेकुई करायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा त्यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्याचवेळी आपले नेते, प्रसारमाध्यमे राज यांची बाजू न घेता, त्यांच्याविरोधातील सर्वच्या सर्व प्रतिक्रिया वारंवार दाखवून त्यांनी उच्चारलेले ‘बिहारींना घुसखोर म्हणून हाकलून लावू,’ हेच वारंवार दाखवत आहेत.

एक मराठी म्हणून आपणा सर्वांचे काही कर्तव्य आहे की नाही?

यापुढे महाराष्ट्राविरोधात विधान करणाऱ्या एकाही नेत्याचे छायाचित्र किंवा त्याचे व्यक्तव्य दाखविणारी वाहिनी आपल्या घरात लावायची नाही, अथवा ते वृत्तपत्र विकत घ्यायचे नाही, अशी भूमिका तरी आपण घेऊ शकतो की नाही? आपण त्यांच्या कोल्हेकुईला महत्त्व देतो, म्हणूनच माजलेल्या हे बिहारी आपल्याच राज्यात येऊन आपल्यावर दंगली लादत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अघोषित सेन्सॉरशीप लादण्याची आता गरज तीव्र झाली आहे.

राज ठाकरे यांनी निषेध मोर्च्याच्या वेळी, तसेच काल बोलतानाही स्पष्ट केले होते, की मला फक्त महाराष्ट्रधर्मच कळतो. माझ्या पक्षाचे नावच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पातळीवर स्वतःला मोठे करवून घेण्यासाठी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. ते जे काही बोलले आहेत, ते सर्वसामान्यांच्या मनातील विचार आहेत.

बिहारी नेत्यांना जाब विचारण्याबरोबरच आपल्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांनाही आपण बोलते केले पाहिजे. महाराष्ट्राला कोणीही बिहारी उठून धमकावत असेल, केंद्रही त्याची पाठराखण करणार असेल, तर पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आक्रमण होत आहे, हे लक्षात घेत सर्वसामान्यांनी राजकारण्यांची वाट न पाहता, काही ठोस कृती करण्याची गरज आहे. अन्यथा धर्मांधांना आश्रय देणाऱ्या बिहारसारख्या देशद्रोही राज्यातून येणारे लोंढे वाढतच राहतील. राज यांनी म्हटल्याप्रमाणे, 11 ऑगस्टला जे काही झाले, ती फक्त झलक होती. त्यापेक्षा गंभीर प्रकार महाराष्ट्रातील जनतेच्या माथी लादले जातील. अमर जवान स्मारकाची विटंबना करणाऱ्या धर्मांध मुस्लिमाला पोलिसांनी पकडल्यानंतर बिहारी नेत्यांनी कोल्हेकुईचा, आमच्या लेखी इतकाच तथ्यांश.

- संजीव ओक

Sanjeev Oak's Blog

Blog Stats
  • 15651 hits